आमदार दीपक केसरकर, रुपेश राऊळ यांनी केला पाठपुरावा; सरपंच विनायक सावंत यांनी मानले आभार
सावंतवाडी ता.१७-:राज्य सरकारकडून मान. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत बांधणीसाठी मंजुरी मिळाली असून, यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये ग्रामपंचायतीचा समावेश असून, यासाठी आमदार दिपक केसरकर यांनी सतत पाठपुरावा करून, ही ग्रामपंचायत बांधण्यासाठी मंजुरी मिळवल्याने ओवळीये ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विनायक सावंत यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी यासाठी सहकार्य केल्याने त्यांचे देखील त्यानी यावेळी आभार व्यक्त केले.
