आचरा येथे दुहेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा

*⚡मालवण ता.१७-:* आचरा पिरावाडी येथे सत्यनारायण महापूजे निमित्त श्री विठ्ठल समाज विकास मंडळ तर्फे आयोजित आणि मुजफ्फर (चावल) मुजावर पुरस्कृत जिल्हास्तरीय दुहेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा दि. ५ मे रोजी रात्री १० वाजता विठ्ठल मंदिर, उत्तरवाडा येथे होणार आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रु. ८००१ व चषक, रु. ५००१ व चषक, ३००१ व चषक तसेच उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी रु. १००१ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

प्रथम येणाऱ्या २० जोड्याना प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावे ३० एप्रिलपूर्वी अनिकेत चोपडेकर ८०१०६५५२०७, दर्शन तारी ७६२०८२१५०२, अजय कोयंडे ९४२२५८०९२१ यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page