अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

*⚡मालवण ता.१८-:* मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून तेजस्विनी हेल्थकेअर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हडी विभागाच्या वतीने रविवारी आयोजित संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीच्या अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत शारीरिक तपासणी करून घेतली. डॉ. रघुनाथ गावडे, डॉ. किरण साळगावकर, डॉ. परेश नांदोस्कर, डॉ. आंनद तावडे, डॉ. नेहा जाधव, डॉ. प्रेम जाधव आदींच्या माध्यमातून ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष विनोद सांडव, जिल्हा उपजिल्हाध्य शैलेश अंधारी, हडी शाखाध्यक्ष दिनेश तोंडवळकर, विभाग अध्यक्ष हरेश भिसळे, चेतन शेडगे, साहिल भिसळे, सुनील नारिंगरेकर, प्रसाद शेडगे, प्रवीण शेडगे, सिद्धांत हडकर, गणेश गावडे, राजू कदम आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page