बांदा दि.१७-:* तेरेखोल नदीच्या खाडीपात्राची पाहणी करण्यासाठी खासदार विनायक राऊत उद्या 18 रोजी दुपारी १२.३० येणार आहेत. खाडीपात्रातून काढण्यात येणाऱ्या गाळाची पाहणी करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तरी परिसरातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.
तेरेखोल नदी खाडीपात्राची उद्या खासदारांकडून पाहणी
