मालवणात होणार गाबीत समाज वधू- वर मेळाव्याचे आयोजन

मालवण ता.१७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबीत समाजातील मुला मुलीसाठी अखिल भारतीय मच्छीमार गाबीत समाज महासंघ आणि मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणात लवकरच वधू-वर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. वधू-वर यांनी मनात कोणतीही दुभाव न ठेवता या मेळावा चर्चासत्रात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. समाजात वधू वर लग्न जुळणे समाजातील आई वडीलांसमोर मोठी समस्या भेडसावत आहे. हे लक्षात घेता समाजातील मुलांनी आणि पालकांनी एकत्रित यावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात तज्ज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

गावा गावातील वधू-वरांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांचे विवाह जमत नाहीत. यामुळे त्यांच्या बऱ्याच पालकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे सर्व लक्षात घेता दोन्ही संस्थेने आपण काहीतरी गावातील वधू-वरांसाठी आगळीवेगळी चर्चा एकत्र येऊन लग्ने जमावित यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घ्यावा. याउद्देशाने लवकरच गाबीत समाजाचा वधू-वर मेळावा घेण्यात येत आहे. तरी संबंधितांनी आपली नावे शंकर पोसम ९९६९९७००५६, हरिश्चंद्र वस्त ९८६९२८९८०२, विजय राऊळ- ९४२३५११८२२, चंद्रहास केळुसकर ९७६९६९०२५१ यांच्याकडे ५ मे पर्यंत नोंदवावीत. जास्तीत जास्त वधू – वर आणि पालकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाचे सरचिटणीस सुरेश बापर्डेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page