डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम

वेंगुर्ला ता.१२-:* डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, वेंगुर्ला तालुका व शहर समिती, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई-शाखा वेंगुर्ला, दलित समाज सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती आनंदवाडी येथे साजरी केली जाणार आहे.

यानिमित्त दि.१३ रोजी स.११ वा. चित्रकला स्पर्धा, सायं.७ वा.गौतम बुद्ध व डॉ.आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण, ७.३० वा. बोधिसेन यांचे प्रवचन, दि.१४ रोजी स.१०.३० वा. मुलांचे भाषणे, ११.३० वा. साई मंगल कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली, दु.१२ वा. डॉ.मानसी सातार्डेकर यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन, दु.३ वा. डॉ.प्रज्ञाकुमार गाधाडे यांच्या उपस्थितीत जाहिर अभिवादन सभा, सायं.५.३० वा. साई मंगल कार्यालय ते बाजारपेठ कॅम्प मार्गे आनंदवाडीपर्यंत सामाजिक ऐक्य व सद्भावना मिरवणूक, दि.१५ रोजी रात्रौ ९ वा. आनंदवाडी येथे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

You cannot copy content of this page