बांदा ता.१२-:* श्री देव घरवडकर प्रासादिक भजन मंडळ, माळीचे घर, मळगाव येथे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या नवोदित आमंत्रित भजन स्पर्धेत विघ्नेश्वर भजन मंडळ, (बावळाट) याने प्रथम क्रमांक पटकाविला. व्दितीय दत्तकृपा भजन मंडळ , ( वैभववाडी ) तृतीय समाधी पुरुष भजन मंडळ, ( मळगाव ) याने मिळवला .
उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे : उत्कृष्ट हार्मोनियम श्रीदेव सावंतवस भजन मंडळ, ( इन्सुली ) उत्कृष्ट पखवाज तबला विघ्नेश्वर भजन मंडळ, ( बावळाट) उत्कृष्ट गायक दत्तकृपा भजन मंडळ, ( वैभववाडी ) उत्कृष्ट झांजवादक दत्तकृपा भजन मंडळ, ( वैभववाडी ) उत्कृष्ट कोरस गणेश भजन मंडळ, ( माजगांव ) शिस्तबध्द संघ गोवर्धन भजन मंडळ, (तुळस) यांनी मिळविला. या भजन स्पर्धेला परीक्षक म्हणून अमोल राऊळ व मयूर पिंगुळकर यांनी काम पाहिले तसेच श्रीदेव घरवडकर प्रासादिक भजन मंडळाचे सर्व सभासद यांच्या हस्ते कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला.
