शटर दुरुस्ती, सर्कस करणाऱ्या टोळक्याला मनसेने दिले पोलिसांच्या ताब्यात

चौकशी करण्याची शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांची मागणी

सावंतवाडी ता.१२-:* शहरात संशयास्पद फिरणाऱ्या काही जणांच्या ग्रुपला आज सावंतवाडी मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. हा ग्रुप संशयास्पदरित्या शहरात फिरत असताना मनसे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी शटर दुरुस्ती आणि सर्कस चे नियोजन करण्यासाठी आलो असल्याचे सांगण्यात आले होते. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले असून, त्यांचे ओळखपत्र पोलिसांनी ताब्यात घ्यावे, आणि शहरात तसेच आजूबाजूच्या परिसरात चुकीचा कोणताही प्रकार घडू नये यासाठी त्यांची चौकशी करून त्यांना तशी समज द्यावी अशी मागणी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी पोलिसांकडे केली आहे.

You cannot copy content of this page