देवगड ता.११-:* सिंधुदुर्ग जिल्हा जैन परिवाराचे २२वे स्नेहसंमेलन व भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव सोहळा गुरूवार दि.१४ एप्रिल रोजी कणकवली बोर्डवे येथील जैन मंदिर येथे साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
डॉ. दीपक तुपकर (सावंतवाडी) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील जैन पुरातन वास्तू जतन व संशोधक समितीचे चेअरमन प्रा संजय कणिरे उपस्थित राहणार आहेत.
भारतीय जैन संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रा. दीपक पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत जिल्ह्यातील जैन बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष अनिल खुटाळे, सल्लागार बाळासाहेब डोर्ले व महिला अध्यक्ष पद्मा दंताळ यांनी केले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत भगवान महावीर जन्म कल्याणक सोहळा होणार आहे.
