वीज वितरणच्या दोन कंत्राटी कामगारांना लागला शॉक

अशोक सावंत,संदेश पारकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

कणकवली ता.०९-:* आचरा येथील ११ केवी लाईनवर चढलेला खाजगी वायरमन आनंद कृष्णा मिराशी (वय-२१,रा. आचरा वरचीवाडी) याला शॉक लागून पेटलेल्या अवस्थेत तो जमिनीवर कोसळला. हा गंभीर जखमी झाला. तसेच नांदगाव उपविभागातील मठ खुर्द येथील वायरमन कौस्तुभ दत्तात्रय नाडकर्णी (रा. तोंडवली,ता.कणकवली) याला देखील फोलवर चढलेला असताना विजेचा शॉक लागून जमिनीवर कोसळल्याने हा देखील गंभीर आहे.

दोघांवरही कणकवली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी या गंभीर रुग्णांना गोवा बांबुळी येथे हलविण्याची सूचना केल्या आहेत. हे दोन्ही कंत्राटी वायरमन असून एका खासगी कॉन्ट्रॅक्टर जवळ काम करत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे कंत्राटी कामगार ५०० काम करत आहेत.

या कंत्राटी कामगारांना फोनवर चढवण्याचे अधिकार नसताना देखील आचरा व नांदगाव या दोन्ही विभागातील कनिष्ठ अभियंता यांनी पोलवर चढवले आहे. त्यामुळे कामगार नेते अशोक सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यासह नातेवाईकांनी या दोघांच्याही घडलेल्या घटनेबाबतची जबाबदारी महावितरण कंपनीने , संबंधित कुटुंबीयांची जबाबदारी स्वीकारावी. दोन्ही तरुण हे कुटुंबाचे आधार होते सर कमी-जास्त झाल्यास त्यांना जबाबदार कोण? अशी अधिकारी व संबंधित ठेकेदाराला विचारणा करत धारेवर धरले. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी अशोक सावंत यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page