पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा मालवण राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

मालवण ता.०९-:* राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवसस्थानावर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस मालवण तालुक्यातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी जो हल्ला केला तो भ्याड हल्ला आहे. पवार यांच्यावर घरावर झालेली दगडफेक ही निंदनीय व घृणास्पद आहे. या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस मालवण तालुका निषेध करत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या प्रसिद्धीपत्रकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, राष्ट्रवादीचे अखिल भारतीय अल्पसंख्यांक सेल सदस्य आगोस्तीन डीसोजा, अल्पसंख्यांक सेल जिल्हा सरचिटणीस अँथनी फर्नांडिस, पदवीधर संघ जिल्हा उपाध्यक्ष अनिता फर्नांडिस, पदवीधर संघ तालुकाध्यक्ष सदफ खटखटे, अल्पसंख्यांक सेल मालवण उपाध्यक्ष फ्रान्सिस डायस, राष्ट्रवादी कृषी तालुकाध्यक्ष सूर्यकांत दाभोलकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सतीश आचरेकर, राज जाधव, घाब्रीयल नरोना आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You cannot copy content of this page