मालवण ता.०९-:* आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरातील रामनवमी उत्सवा निमित्त अभय भोसले मित्रमंडळीच्या वतीने बुधवार दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता आचरा रामेश्वर मंदिरनजिकच्या मैदानावर दिवस- रात्र जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी प्रथम विजेत्या संघास सात हजार रुपये व चषक, द्वितीय विजेत्या संघास पाच हजार रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ विजेत्या संघास प्रत्येकी दोन हजार रुपये व पुढील सहभागी सर्व संघाना रोख रुपये एक हजार रुपये मानधन म्हणुन दिले जाणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या संघांनी नाव नोंदणी साठी सदा पुजारे – ९५४५०५५२४६ सुरेंद्र सकपाळ , ९४२३३०१५८४ ,०२३६५-२४६०९९ या नंबरवर १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत संपर्क साधावा. संघ कमी आल्यास साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील. सामने चालु झाले नंतर प्रवेश दिला जाणार नाही तरी इच्छूक संघानी सहभाग होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
