केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात १० एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रम

मालवण ता.०९-:* भाजपा नेते, केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस मालवणात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. मालवण तालुक्यात दि. १० ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस १० एप्रिल रोजी साजरा होत आहे.

यानिमित्ताने मालवण तालुक्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये चिंदर येथे जिल्हास्तरीय दिंडीनृत्य स्पर्धा, प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण येथे रुग्णांना फळ वाटप आणि बेडशीट भेट, मठबुद्रुक येथे शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात फळवाटप, आणि कातकरी समाज वस्तीवर कपडे वाटप, माळगाव येथे नेत्र तपासणी शिबीर आणि अन्य ठिकाणी लोकोपयोगी, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम आणि विकास कामांची भूमिपूजने होणार आहेत, अशी माहिती तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

You cannot copy content of this page