सिंधुदुर्गचा दबदबा देशात ठेवणाऱ्या नारायण राणे यांचा आज वाढदिवस

७० व्या वाढदिनी सुद्धा नागरिकांच्या विकासाचा ध्यास घेतलेले कार्यतत्पर नेतृत्व;जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी ना राणेंचा वाढदिवस होतोय साजरा

सिंधुदुर्ग दि.१०-: खंबीर नेतृत्व, पराकोटीची जिद्द, कार्यतत्परता, स्पष्टवक्तेपणा, मुत्सद्दीपणा आणि दूरदृष्टिता, कोणालाही भिडण्याची ताकद, संकटात न डगमगता धीरोदात्तपणे सामोरे जाण्याची क्षमता, एका शाबासकीने कार्यकर्ते घडविण्याचे कौशल्य अशा विविधांगी गुणांनी परिपूर्ण आणि ज्याचे नाव देशात सिंधुदुर्ग ज़िल्ह्याची ओळख बनले आहे, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे कोकणचे सुपुत्र, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे. अवकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आजच्या वाढदिनी घेतलेला संक्षिप्त आढावा…

भगवान श्री परशुरामाच्या या पावन कोकणभूमीने अनेक नररत्ने आपल्या देशाला दिली. साहित्य, संस्कृती आणि पंरपरेचा मेळ म्हणजे कोकण. आणि या परंपरेत आता राजकीय क्षेत्राचाही समावेश झालाय, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अशा या या कोकणात आपल्या दुरदृष्टी नेतृत्वाने, अभ्यासपुर्ण कार्याने आणि आदर्श व शाश्वत विचाराने देशात नावारुपाला आलेले एक झझावांती नेतृत्व म्हणजे कोकणचे दादा अर्थात नारायणराव राणे. कोकणच्या भूमीत नारायण राणे यांचा राजकीय उदय होईपर्यंत इथले नेतृत्वही फारसे फुलले नाही. मात्र, नारायण राणे यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने, माणसे जोडण्याच्या स्वभावाने महाराष्ट्राच्या राजकारणात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे.

कोकणच्या राजकीय क्षितिजावर नारायण राणे नावाचा उदय झाला आणि या कोकणचे जणू भाग्य बदलले. त्याकाळी मुंबईच्या मनिऑर्डरवर जगणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या सिंधुदुर्गची ‘ती’ ओळख पुसून जिल्ह्याला नवी दिशा देतानाच प्रगतीच्या शिखरावर पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. इतकेच नव्हे तर कोकणची स्वतंत्र ओळख त्यांनी महाराष्ट्रासह देशाला घडविली.

महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर कोकणाला नारायण राणे यांच्यामुळेच वलय प्राप्त झाले आहे. कोकणातील तळागाळातील जनतेत असलेले सौहार्दपूर्ण संबंध, कणखर आणि तितकेच कनवाळू हृदय यामुळे त्यांच्याप्रती एक आदरयुक्त भीती कोकणवासियांच्या मनात कायमच राहिली आहे. कोकणचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांची राजकीय वाटचाल यशस्वीतेने सुरु आहे. कोकणातील घराघरांत आजही नारायण राणे यांना वेगळा सन्मान आहे.

रंजल्या-गांजल्या हजारो कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी सन्मानाचे जीवन देत अनेक संसार उभे केले आहेत. आर्थिक सहाय्याबरोबरच पाठीवर विश्वासाचा हात ठेवला. म्हणूनच खऱ्या अर्थाने कोकणचे भाग्यविधाते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. निसर्गाने भरभरून दिलेला हा प्रदेश योग्य व प्रभावी नेतृत्वाअभावी विकासापासून शेकडो कोस दूर होता. परंतु १९९० साली नारायण राणे यांचे या जिल्हयात आगमन झाले आणि या प्रदेशाचाही जणू भाग्योदय झाला. शिक्षण ही मूठभर लोकांचीच मक्तेदारी असलेल्या कोकणात त्यावेळी शिक्षणाच्या चांगल्या सोयी नव्हत्या.

शाळा कुठे तरी पाच-सहा किलो मीटरवर असायची. तिथे पोहोचण्यासाठी रस्ते नसायचे. तास-दोन तासांची पायपीट करून आणि अनेकदा धोकादायक साकवावरून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागायचे. म्हणूनच शिक्षणामध्ये कोकण मागे होते. परंतु नारायण राणे १९९० साली या भागाचे आमदार झाले आणि विकासाची गंगा कोकणात दुथडी वाहू लागली. रस्ते झाले, शिक्षणाच्या सोयी झाल्या. मराठी शिक्षण मिळणे दुरापास्त असलेल्या कोकणात इंग्रजी माध्यमांची विद्यालये आली. आय टी आय, इंजिनिअरींग कॉलेज आले. लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यात नारायण राणे यांना यश आले.

म्हणूनच गेल्या काही वर्षापासून दहावी-बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल महाराष्ट्राच्या अवलस्थानी राहिला आहे. कोकणची लोककला दशावतार व त्या विषयी असणारी ना. राणे यांची आस्थेचे अनेकदा कलाकार आणि रसिकाना दर्शन झाले आहे. कोरोनाच्या साथीत पडत्या काळात या कलावंताच्या पाठिशी ठामपणे राहाणारे दादा लोककला संवर्धनासाठीही तितकेच प्रयत्नशील असतात हे त्यांच्या रसिकतेचे द्योतकच म्हणावे लागेल. कोकणातील सर्वसामान्य जनतेमध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण व्हावी, यासाठी ते नेहमीच कार्यरत असतात. येथील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी त्यांनी विविध फळप्रक्रिया प्रकल्प, मासेप्रक्रिया प्रकल्प उभे केले. उद्योगामध्ये लोकांमध्ये जागृती झाली.

शिक्षणाने व्यावसायिक आणि औद्योगिक शहाणपण आले. त्यामुळे कोकणात आर्थिक सुधारणाही होऊ लागल्या. कोकणातील महिलांनाही आर्थिक स्थैर्य मिळाले पाहिजे, या उद्देशाने त्यांनी बचतगटांची चळवळ उभी केली. या बचतगटांनी केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी राबविलेले उपक्रम कोकणातील जनता कधीही विसरणार नाही. विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी निर्माण केलेला दरारा त्यांच्या उत्कृष्ट संसदपटूपणाची साक्ष देवुन गेला. या काळातील त्यांची अनेक भाषणे आजही संग्राह्य आहेत. सिंध

You cannot copy content of this page