मालवण ता.०८-:* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चरच्या कोकण विभागातील टीमने उपाध्यक्ष चंद्रशेखर पुनाळेकर यांच्या नेतृत्वाखाली अशोक सारंग, मनोज वालावलकर, निखिल वस्त यांनी औरंगाबाद येथील एक्सलन्स सेंटरची भेट घेऊन माहिती घेतली. सुमारे १०० कोटी रुपये खर्च करुन सिंधुदुर्गमध्ये होऊ घातलेल्या ” स्व. खास. एकनाथ ठाकूर एक्सलन्स सेंटर” च्या स्थापनेच्या दृष्टीने ही भेट महत्वपूर्ण आहे.
यावेळी चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी मार्गदर्शन केले. एक्सलन्स सेंटरच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे ३००० पेक्षा जास्त कुटुंबांना थेट लाभ होणार असून या माध्यमातून साधारणतः दरवर्षी रु. ३०० कोटीची उलाढाल अपेक्षीत आहे.
