Headlines

वळीवाच्या पावसामुळे किंजवडे येथील ४ घरांचे मोठे नुकसान…

आंबा बागायतीचे देखील लाखोंचे नुकसान

देवगड-प्रतिनिधी तालुक्यामध्ये मंगळवारी पडलेल्या वळीवाच्या पावसामुळे किंजवडे येथील चार घरांचे कौले,सिमेंटचे पत्रे उडून तर तालुक्यातील काहि गावांमध्ये आंबा कलमांवरील हापूस आंबे पडुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेले दोन दिवस वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे देवगड हापूस आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी रात्री 9 वा. सुमारास वळीवाचा पाऊस, सोसाटयाचा वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने किंजवडे येथील पांडुरंग नाना परब यांच्या राहत्या घराचे पाच सिमेंटचे पत्रे वा-याने उडुन जावून नुकसान झाले आहे. तर किंजवडे येथील शांताराम मेस्त्री,कैलास बगाड,पुंडलिंक ठाकुर यांच्याहि घरांची पत्रे तसेच कौले उडून किरकोळ स्वरुपात नुकसान झाले आहे. तर किंजवडे येथील श्यामसुंदर पाडावे यांच्या कलम बागेतील हापूस आंब्याचे कलम मुळासकट उन्मळून नुकसान झाले आहे तर तालुक्यातील काहि गावांमधील हापूस आंब्याच्या झाडावरीलही आंबेही पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वळीवाच्या पावसाने यावर्षी थैमान घातले असून देवगड तालुक्यामध्ये गेली दोन दिवस सातत्याने पाऊस पडत राहिल्यामुळे देवगड हापूस आंब्याचे पिकहि धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगळवारी रात्री 9 वा. सुमारास पावसासह वादळी पाऊस पडत राहिल्यामुळे काहि घरांचे काहि हापूस कलमे मुळासकट उन्मळून तर हापुस आंब्यांचे नुकसान झाले आहे. गेली दोन दिवस वळीवाचा पाऊस पडत राहिल्यामुळे हापूस आंबे देठाजवळून खराब होण्याची शक्यता वर्तवितण्यात येत आहे. तसेच आंब्याना काळे डागही पावसामुळे पडू शकतात. यासाठी शेतक-यांना पुन्हा एकदा बुरशी नाशकाच्या अतिरिक्त कराव्या लागणार आहेत. बदलत्या वातावरणामध्ये व वळीवाच्या पावसामुळे आंबा पिक टिकविणे हि एक मोठी बागायतदारांसमोर फार मोठी समस्याच निर्माण झाली आहे. अनेक नैसर्गिक आपत्तीला देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी यावर्षी तोंड देत आंबा पिक चांगल्याप्रकारे टिकविले आहे. 15 ते 20 एप्रिल नंतर तालुकयातील हजारो मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन असल्याचे बोलले जात असतानाच वळीवाच्या पावसाने हाता तोंडाशी आलेले भरघोष प्रमाणात आंब्याचे पिक वाया जाते कि काय अश्या धास्तीने आता आंबा बागायतदार चिंतातूर झाला आहे. फोटो-किंजवडे येथील श्यामसुंदर पाडाचे यांचे मुळासकट उन्मळून पडलेले आंबा कलम छाया-वैभव केळकर

You cannot copy content of this page