साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरोपिकपला अपघात…

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले मदतकार्य; चालक किरकोळ जख्मी

सावंतवाडीत ता.०६-:* गोव्यातून सातोळी बावळट मार्गे साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो पिकप मालवाहतूक गाडीचा स्लीप होऊन अपघात घडला. ही घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली.यात ती गाडी बाजूच्या घळणीत कोसळली ही बाब त्या ठिकाणाहून जाणाऱ्या कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच जेसीबी बोलून ती गाडी वर काढण्यात आली. यासाठी महेंद्र सांगेलकर; बबन डिसोजा, सत्यवान बंड,यांनी मदत कार्य केले. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

You cannot copy content of this page