सावंतवाडी तलावाच्याकाठी प्रोडक मार्केटिंगच्या मुलींची फ्रिस्टाईल

प्रकरण पोलीस ठाण्यात : शहरात मात्र जोरदार चर्चा

सावंतवाडी ता.०६-:* येथील मोती तलावाच्या काठी 1 विरुद्ध 5 अशा प्रोडक मार्केटिंगच्या मुलींची जोरदार मारामारी रंगली यात एका मुलीच्या घरातील व्यक्तीने त्याठिकाणी येत मारामारीत सहभाग घेतला यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले या मुलींच्या फ्रीस्टाइल मारामारीची चर्चा मात्र काही क्षणातच शहरात सुरू झाली.

याबाबतची अधिक माहिती अशी की 2 वेगवेगळ्या कंपनीच्या प्रोडक्ट मार्केटींगच्या मुलीची व्यवसायातील स्पर्धेतून या अगोदर एका गावात मारामारी झाली होती त्यानंतर तोच मारामारीचा राग काढून आज सायंकाळी येथील मोती तलावाकाठी 1 विरुद्ध 5 अशी मारामारी रंगली. या मारामारीचा माहिती घरच्यांना समजतात एका मुलीच्या घरच्यांनी देखिल मारामारी सहभाग घेतला मुलींची मारामारी झाल्याची पाहताच घटनास्थळी बघ्यांनी मात्र एकच गर्दी केली घटनास्थळी पोलिस दाखल होत मध्यस्ती केली यानंतर हे प्रकरणात मात्र येथील पोलीस ठाण्यात पोहोचले

You cannot copy content of this page