लक्ष्मी माठेकर यांचे निधन

*सावंतवाडी ता.०६-:* येथील सबनीसवाडा परिसरात राहणाऱ्या लक्ष्मी माठेकर यांचे काल मध्यरात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ६५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाने सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेले काही दिवस त्या आजारी असल्याने त्यांच्यावर गोवा बांबुळी येथे उपचार सुरू होते. मात्र काल त्यांचे निधन झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, दोन नातू, एक सुन असा परिवार आहे.

You cannot copy content of this page