आई नरसुले समाधी मंदिरात श्रीराम नवमी उत्सव

वेंगुर्ला ता.०७-:* उभादांडा येथील प.पू.आई नरसुले समाधी मंदिरात सालाबादप्रमाणे १० एप्रिल रोजी श्रीरामनवमी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त पहाटे ५ वा. काकड आरती, सकाळी ९ वा. मठाधिशाची नारळ बदली, ११ वा. होमहवन, ११.३० वा. ह.भ.प.सावळाराम कुर्ले यांचे किर्तन, दुपारी १२ वा. रामास पाळण्यात घालणे, पाळणगीत, आरती, भजन व तिर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित राहून तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक मोहनदास नरसुले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page