तरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील;सिंधुरत्न समृद्धी योजना अध्यक्ष आ दीपक केसरकर यांचा विश्वास
सावंतवाडी ता.०६-: चांदा ते बांदा योजना ज्यावेळी राबविण्यात आली त्यावेळी मुख्य भर हा ग्रामीण भागातील बचत गटांवर देण्यात आला होता. ग्रामीण भागाबरोबरच शहराचे देखील उत्पन्न वाढवायचे असेल तर नगरपालिका आणि शहरातील बचत गटांनी एकत्र काम करणे गरजेचे असून याद्वारे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील नगरपालिकेने जागेची उपलब्धता, व्यवसायाची उपलब्धता याची सांगड महिलाच्या रोजगारात घातली तर नक्कीच चमत्कार घडेल असा विश्वास सिंधुरत्न समृद्धी योजनेचे अध्यक्ष आमदार दिपक केसरकर यांनी पालिकेतील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
