प्रचंड नुकसान : शेतकरी हवालदील
दोडामार्ग ता.०६-:* बुधवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट वीजेचा लखलखाट करत दाखल झालेल्या अवकाळी वादळी पावसाने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात हाहाकार माजवला प्रंचड वेगाने आलेल्या या वादळी वाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान केले तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडली त्यामुळे दोडामार्ग विजघर पडवे माजगाव तळकट मार्गे बंद झाझे तर अनेकांच्या घरावर नारळाची तसेच आंबा फणसाची झाडे पडून नुकसान झाले.
तर हजारो केळीची झाडे जमीन दोस्त झाली.अनेक ठिकाणी वीज खांब मोडून वीज पुरवठा खंडीत झाला या पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात मिळून लाखो रूपये नुकसान झाले आहे.
