विवाहाच्या समस्या सोडविण्यासाठी आंतरजातीय समन्वय समिती स्थापणार

9 एप्रिल रोजी कणकवलीत बैठक; उपस्थित राहण्याचे आवाहन

कणकवली ता.०६-:* समाजातील विवाहाच्या समस्या सोडविण्यासाठी आणि आंतरजातीय विवाह करण्यासाठी इच्छुक वधु वरांसाठी विचारविनिमय करून मार्ग काढण्यासाठी आपल्या विविध समाजातील जातींच्या प्रतिनिधीची “आंतरजातीय समन्वय समिती”स्थापित करण्याचे ठरविले आहे.

त्यासाठी शनिवार 9 एप्रिल 2022 रोजी श्री भवानी सभागृह ,तेलीआळी, कणकवली येथे सकाळी ठिक 10 वाजता बैठक आयोजित केली आहे. अशी माहिती अखिल भारतीय गाबित समाज,व जिल्हा संघटक गाबीत समाज,राष्ट्रीय संघटक चंद्रशेखर उपरकर यांनी दिली. चंद्रशेखर उपरकर म्हणाले, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या जातीच्या संस्था व संघटनांसाठी सातत्याने कार्यरत आहात.समाजाच्या विविध थरातील लोकांसाठी अन्य प्रकारचे कार्य करीत असताना सर्वच समाजामध्ये सध्या उपवर मुला मुलींच्या विवाहाच्या समस्या वाढल्या आहेत. शिवाय वधुवरांच्या अपेक्षा वाढल्यामुळे घटस्फोटितांचे प्रमाणहीँ वाढत आहे. शिवाय कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे विवाह रखडले आहेत परिणामी मुलांची वये वाढत आहेत.मुलांच्या देशी-परदेशी नोकऱ्यांचे व सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे व कोरोना काळात नोकऱ्या गेल्याने आई वडिलांचा मानसिक ताण वाढला आहे.

म्हणूनच तरी इच्छुक जातींच्या संस्था व संघटना प्रतिनिधिनी किंवा पदाधिकाऱ्यानी वेळीच उपस्थित राहून सहकार्य क्ररावे असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज संघटनेचे राष्ट्रीय संघटक श्री.चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.

सदरील बैठकीस गाबीत समाज, सोनार,मराठा, तेली, शिंपी,कुंभार, गुरव,वैश्य,धनगर,चर्मकार वगैरे समाजातील प्रतिनिधि उपस्थित राहण्याची शक्यता आहे.अशाप्रकारे प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर कमिटया स्थापन करनणयासाठी प्रयत्न करणे त्याचबरोबर येत्या 2 महिन्यात शक्यतो प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र वधु वर मेळावा घेणे,सर्व जातीसाठी एकत्रित मेळाव्याचे आयोजन करणे, घटस्फोटीतांसाठी स्वतंत्र मेळावा घेणे,विधुर व विध्वांसाठी मेळावा आयोजित करून समाजातील प्रत्येक घटकासाठी निःस्वार्थी भावनेने काम करण्याचा प्रयत्न केला जाईलअसे चंद्रशेखर उपरकर म्हणाले.

You cannot copy content of this page