सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांचा बांधकाम विभागास इशारा
आंबोली ता.०४-:* येथील घाटातील मुख्य दरडी च्या वळणाजवळ कठडा तुटल्याने धोकादायक स्थितीत आहे.या ठिकाणी हा कठडा पावसाळ्यात तुटला असून या ठिकाणी ८ महिने धोकादायक परिस्थिती आहे.वारंवार सांगून देखील तात्पुरती उपाययोजना देखील बांधकाम विभागाने केलेली नाही.आतापर्यंत याठिकाणी कठडा बांधण्यास हयगय केल्याने या ठिकाणी अपघाताची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग बघत आहे काय असा सवाल विचारला जात आहे.या ठिकाणी ४०० ते ५०० फूट खोल दरी आहे.अपघात झाल्यास थेट कोसळू शकतो. वारंवार सांगून देखील प्रशासन या ठिकाणी काहीही करत नाही.८ दिवसात या ठिकाणी कठडा न बांधल्यास बांधकाम कार्यालयासमोर ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आंबोलीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी दिला आहे.

