बैल झुंज आयोजित करणाऱ्या आयोजकांसह बैल मालकावर गुन्हा दाखल करा…

वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष अक्षय कदम यांची मागणी; जिल्ह्यात बैल झुंज आयोजनाला कायमची बंदी घाला

मालवण ता.०४-:* तालुक्यात तळगाव या ठिकाणी दिनांक २८ मार्च रोजी अवैध रित्या आयोजित करण्यात आलेल्या बैल झुंजी मध्ये वेंगुर्ला येथील बाबू नावाच्या बैलाचा दुर्देवी मृत्यू झाला असून, मुक्या प्राण्यांना नशा देऊन अशाप्रकारे झुंज आयोजित करणाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच बैल मालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि बाबू नावाच्या बैलाचा मृत्यूची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी मालवण तालुकाध्यक्ष अक्षय कदम यांनी मालवण पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यास बंदी घालण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page