मालवण ता.३०-:* आचरा जामडूल येथील मच्छीमार प्रमोद वाडेकर यांनी पाण्यात पडलेल्या समुद्री गरुड या पक्षाच्या पिल्लाला पाण्यातून बाहेर काढून योग्यती काळजी घेऊन कोकण वाईल्ड लाईफ संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडले. आचरे खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या वाडेकर यांना समुद्री गरुड म्हणजेच कांकण (white bellied sea eagle) या पक्ष्याचे पिल्लू पाण्यात पडलेले आढळून आले.
त्या पिल्लाला वाडेकर यांनी पाण्यातून बाहेर काढत आपल्या घरी आणले. पुर्णपणे थकलेल्या व उडता न येणाऱ्या या पक्ष्याला त्यांनी पाणी व मासे खाऊ घातले. काही तास विक्षांतीसाठी सुरक्षित जागी ठेवले. भिजलेले शरीर सुकल्यावर व त्याला तरतरीतपणा आल्यावर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यासाठी त्यांना पक्षीतज्ञ डॉ मगदूम, प्राणीमित्र स्वप्निल गोसावी, प्राणीशास्त्र विद्यार्थी अँलिस्टर फर्नांडिस, स्थानिक सचीन सारंग व कोकण वाईल्ड लाईफ या संस्थेने मदत केली.
