पर्यटन मंत्र्यांनी पर्यटन व्यवसायिक आणि बागायतदार यांच्याशी चर्चा करणे गरजेचे होते…

आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया

देवगड ता.२९-:* पर्यटन पर्यावरण मंत्री यांचा जिल्हा दौरा येथील पर्यटन व्यवसायिक, हॉटेल मालक व्यापारीवर्ग , वॉटर स्पोर्ट्स यांच्याशी सुसंवाद साधणे महत्त्वाचे होते. कोरोना काळात या व्यावसायिकांचे नुकसान झाले असून त्याबाबत चर्चा करणे महत्त्वाची होते तसेच वातावरणातील अवकाळी बदलामुळे आंबा काजू बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांच्याशी सुसंवाद साधणे महत्त्वाचे होते. मामाच्या गावाला जात असताना याबाबत चर्चा होणे महत्वाचे होते राजकारण बाजूला ठेवून या दोन्ही गोष्टींना पर्यटनमंत्री पर्यावरण मंत्री यांनी प्राधान्य देणं महत्त्वाचं होतं. अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना बोलताना दिली. देवगड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व पदाधिकारी नियुक्त , व पक्षप्रवेश यांच्या निमित्ताने ते देवगड तालुका दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी सु संवाद साधला.

या वेळी माजी आमदार अजित गोगटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या पुढे बोलताना ते यापुढे बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले त्या जिल्ह्याचे खासदार यांनी निव्वळ बीएसएनएल टॉवर चे उदघाटन एवढेच न करता या भागात नेटवर्क अभाव आहे तो दूर करण्याकरिता पर्यटन मंत्री यानी पाहणी करणे व माहिती घेणे महत्वाचे होते.असे सांगून रिफायनरी प्रकल्प जिथे आहे तेथेच होणार असून स्थानिकांचा विरोध नाही.रिफायनरी ही होणारच असा उल्लेख करून नाम.नारायण राणे,माजी आम.प्रमोद जठार,व अन्य शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन या हा प्रकल्प ग्रीन रिफायनरी प्रकल्प म्हणून मार्गी लावणार आहोत.नवीन गावाची चर्चा ही शिवसेनेच्या नेत्यांनी सुरू केलेली आहे.परंतु प्रकल्प ज्या गावात आहे तेथेच होणार आहेअसे आवर्जून सांगितले. फोटो -पत्रकार परिषदेत बोलताना आम.नितेश राणे व अन्य

You cannot copy content of this page