जळगाव येथील अँड मुकेश कुरील यांनी संविधान साक्षरता अभियानाला केली सुरुवात…

३२ पैकी १८ जिल्ह्यांचा प्रवास पूर्ण…

वैभववाडी प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जळगाव येथील अॕड मुकेश राजेश कुरील यांनी संविधान साक्षरता अभियाना सुरु केले आहे.महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात सायकलने फिरुन जनजागृती करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.त्याप्रमाणे १८ जिल्ह्यातून त्यांनी सायकलने १७०० कि.मी.प्रवास केला आहे.तर उर्वरित १४ जिल्ह्यात मोटार सायकलने प्रवास करीत आहेत.रविवारी दुपारी ते मोटारसायकलने वैभववाडी येथे आले.त्यांचे वैभववाडी येथे वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने स्वागत करण्यात आले.

२७ फेब्रुवारीला जळगाव येथून त्यांनी प्रवास सुरु केला आहे.तर ९ एप्रिलला पुन्हा जळगाव असा ३२ जिल्ह्याचा सुमारे ३६०० कि.मी.चा प्रवास करीत संविधान साक्षरता अभियानातून जनजागृती करणार आहेत. जळगाव येथील मुकेश कुरील यांनी आपल्या संविधान साक्षरता अभियान विषयी बोलतांना सांगितले, भारतीय संविधान सर्वांनी वाचावे हा या अभियानाचा हेतू असून यासाठी आपण महाराष्ट्र भ्रमण करीत आहोत.लोकांना संविधान दाखविणे, त्याच्या प्रास्ताविकेचे वाचन करणे.त्याबाबत चर्चा करणे.त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कार्याकर्यांना भेटणे त्याचे मार्गदर्शन व अभिप्राय घेणे.संविधान साक्षरता अभियान ही मोठी संकल्पना असून त्यासाठी पुढच्या २० वर्षात संविधानाचा प्रचार करणार आहे.जळगाव जिल्हा संविधान साक्षर जिल्हा म्हणून जिल्ह्याची ओळख निर्माण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.या अभियानासाठी समाजातील सर्व लोकांकडून मला सहकार्य मिळत आहे.बसपाचे संस्थापक कांशिराम यांचा आदर्श घेऊन मी हा संकल्प केला आहे.असे सांगितले.

प्रवासादरम्यान संबंधित जिल्हाधिकारी यांना आपण निवेदन देत शाळा, महाविदयालये व शासकीय कार्यालये येथे संविधानाची प्रत उपलब्ध करुन देण्याची मागणी करणार आहेत.

वैभववाडी येथे तालुका संघाचे सहसचिव शरद कांबळे, उपाध्यक्ष संतोष कदम, सुहास जाधव, रुपेश कांबळे, मारुती कांबळे यांनी त्यांचे स्वागत करुन त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी व अभियानासाठी शुभेच्छा दिल्या. फोटो- वैभववाडी येथे संघाचे सहसचिव शरद कांबळे मुकेश कुरील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतांना . छाया- संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page