तालुक्यातील रिक्त पोलिस पाटील आणि कोतवालाची पदे तातडीने भरा…

युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांची प्रांताधिकारी यांच्याकडे मागणी…

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील १६ गावातील रिक्त पोलिस पाटील व ५ तलाठी सजा येथील कोतवालांची रिक्त पदे तातडीने भरावी.अशी मागणी युवक काॕग्रेस वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी प्रांताधिकारी कणकवली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

वैभववाडी तालुका डोंगराळ व दुर्गम तालुका आहे.तालुक्यातील तब्बल १६ गावातील पोलिस पाटील पद रिक्त आहे.रिक्त पोलिस पाटील गावाचा अतिरिक्त कार्यभार हा जवळच्या पोलिस पाटील यांच्याकडे दिला जातो.एका पोलिस पाटील यांच्याकडे तब्बल चार पाच महसूली गावांचा कार्यभार दिला गेला आहे.त्यामुळे संबंधित पोलिस पाटील यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.तसेच नागरीकांनाही पोलिस पाटील यांच्याकडे काम असल्यास हेलपाटे मारावे लागत आहेत.गावात एखादी कायदा सुव्यस्थे सारखा प्रश्न निर्माण झाला तर पोलिस पाटील नसल्यामुळे अडचण होत आहे.तालुक्यातील भोम, सडुरे, तिथवली, एडगांव, उपळे, आचिर्णे, भुईबावडा , कुंभवडे, कोळपे, नेर्ले, खांबाळे, सांगुळवाडी, वायंबोशी, हेत, मौंदे, नावळे आदी १६ गावातील पोलिस पाटील पदे रिक्त आहेत. तसेच तलाठी सजा येथील कोतवालांच्या रिक्त पदांमुळे नागरीकांची गैरसोय होत आहे.नापणे, कुसूर, नेर्ले, तिरवडे तर्फ सौंदळ, कुर्ली या पाच ठिकाणी कोतवाल पद रिक्त आहे.

गावातील सर्वसामान्य लोकांच्या कामाशी संबंधित ही पोलिस पाटील व कोतवाल ही पदे आरक्षणानुसार भरण्यात यावीत.अशी मागणी जाधव यांनी केली आहे.अन्यथा जनतेच्या रोषास सामोरा जावे लागेल असा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे. फोटो-

You cannot copy content of this page