आ नितेश राणे यांच्यासह दत्ता सामंत, सतीश सावंत,यांचा समावेश
ओरोस ता.२९-: ५ मार्च २०१६ रोजी झालेल्या डंपर आंदोलना दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात अनधिकृतपणे घुसून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आ नितेश राणे यांच्यासह ४१ जणांची जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये भाजप नेते तथा तत्कालीन गौण खनिज संघटना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत,, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,संग्राम प्रभूगांवकर यांचा समावेश आहे. याप्रकरणी वकील संग्राम देसाई, अविनाश परब व सुहास साटम यांनी काम पाहिले.
