आरोंदा येथे पर्यावरणपूरक प्रकल्प व्हावा

सागर नाणोसकर यांचे आदित्य ठाकरेंना निवेदन

सावंतवाडी ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी भेट घेऊन काही रोजगार, उद्योग आणि विकास कामांसंदर्भात निवेदन दिले. या सर्व मागण्याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर दिली सकारात्मक प्रतिक्रिया देत लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती नाणोसकर यांनी दिली.

या निवेदनात आरोंदा तेरेखोल खाडी नजिक पर्यावरण पूरक प्रकल्प यावा जेणेकरून रोजगार आणि जिल्ह्याचा आर्थिक विकास साधण्यासाठी प्रयत्न व्हावा. यशवंतगड रेडी डागडुजी साठी आवश्यक निधी मिळावा रेडी, शिरोडा ते सागरतीर्थ समुद्र किनारी धुपप्रतिबंधक बंधारा व्हावा यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी. या महत्त्वाच्या कामांसंदर्भात लक्ष वेधले. सागर सोमकांत नाणोसकर यांनी केला. यावेळी सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत, रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदार विनायक राऊत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आमदार दिपक केसरकर, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

You cannot copy content of this page