सरमळे येथे झाले उत्साहात संपन्न;लायन्स क्लब अध्यक्ष अँड. परिमल नाईक होते अध्यक्षस्थानी
सावंतवाडी ता.२९-:* येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे एन. एस. एस. शिबीर सरमळे येथे पार पडले. शिबिराचा समारोप उत्साहात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब सावंतवाडीचे अँड. परिमल नाईक होते.गेले सात दिवस आयुर्वेद कॉलेज आयोजित एन. एस. एस. सेवा कार्य कार्यक्रमात सुमारे 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी, शीक्षण, महामारी स्वछता, प्रथोमपचार, जल संवर्धन व महत्व, पथ नाट्य ई. उपक्रमाद्वारे सेवा कार्य व सामाजिक प्रबोधन करण्यात आले.
लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या वतीने बाळासाहेब बोर्डेकर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातही दिवस नाश्ता व अल्पोहराची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपले सेवाकार्य विषयक अनुभव विषद केले. तसेच ला. अध्यक्ष अँड. परिमल नाईक, ला. झेड. सी. अशोक, ला. बाळ बोर्डेकर, ला. अमेय पई, प्राचार्य बाबासाहेब पाटील यांनी एन. एस. एस. व सेवा करायचे राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक महत्व या विषयी मार्गदर्शन केले.या प्रसंगी बाळासाहेब बोर्डेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.
