बेळणे येथील रस्त्याच्या कामाचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याहस्ते शुभारंभ

कणकवली ता.२८-:* कणकवली तालुक्यातील बेळणे खालची वाडी येथील मुख्य रस्ता ते दशरथ चाळके घरापर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.गेले कित्येक वर्षे या वाडीतील रस्त्याच्या प्रश्न प्रलंबित होता.रामदास विखाळे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून हे काम जनसुविधा योजने अंतर्गत हाती घेण्यात आले आहे.

याबद्दल ग्रामस्थाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी बेळणे सरपंच दीक्षा चाळके,राजू राठोड,ललित घाडीगावकर,शरद सरंगले,सचिन आचरेकर,लवू चाळके,दशरथ चाळके,अविनाश गिरकर, विनय हडकर,परेश आचरेकर,अवि गिरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page