डेरवण येथील नेमबाजी स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या साईश तळणकरचे यश

भोपाळ व दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय निवड पूर्व चाचणीसाठी निवड

सावंतवाडी ता.२५-:* डेरवण येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय युथ नेमबाजी स्पर्धेत मळगांव इंग्लिश स्कूल मळगावचा विद्यार्थी साईश दिंगबर तळणकर याने १७ वर्षाखालील गटात १० मीटर एअर पिस्टल प्रकारात ४०० पैकी ३७७ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. भोपाळ व दिल्ली येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय निवड पूर्व चाचणीसाठी त्याची निवड झाली आहे.

यापूर्वी २०२१ मध्ये सुद्धा साईश याने याच क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकाविले होते. साईश याला प्रशिक्षक कांचन उपरकर व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले व आई वडील यांचे मार्गदर्शन लाभले असून येत्या २५ मार्चपासून भोपाळ येथे सुरु होणाऱ्या व १५ एप्रिलपासून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय निवड पूर्व चाचणीसाठी साईशची निवड झाली आहे. साईश याच्या या यशाबद्दल संस्था सचिव आर. आर. राऊळ, अध्यक्ष मळगावकर ,खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापिका श्रध्दा सावंत, पर्यवेक्षक फाले तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page