स्विमिंग पूल सुरू करा

सुधीर आडीवरेकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी

सावंतवाडी ता.२५-:* सावंतवाडी शहरात अद्ययावत स्वीमिंग पूल असून दिड वर्षांपूर्वी त्यात फिल्टर मशीन बसवलेली आहे. मात्र, कोरोनाकाळापासून हे स्वीमिंग पूल वापरात नसून याचा फटका शहरातील जलतरणपटूंना बसत आहे. त्यामुळे हे स्वीमिंग पूल चालू करण्यासंदर्भात माजी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडिवरेकर यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेतली. हे स्विमिंग पूल कार्यान्वीत करण्यासंदर्भात त्यांनी मागणी केली.

यावेळी काही तांत्रिक अडचणी सांगत हे पुल बंद असल्यास मुख्याधिकारी यांनी सांगितले. त्या ठिकाणी ट्रेनर नसल्यानं हे स्वीमिंग पूल बंद आहे. स्वीमिंग सुरू करताना जेन्टस आणि लेडिज ट्रेनरसह २ लाईफ गार्डची आवश्यकता आहे. ट्रेनरची नियुक्ती करण्यासंदर्भात प्रशासन हालचाल करत असून हे ट्रेनर प्राप्त झाल्यास लागलीच हे स्वीमिंग पूल सुरू केलं जाणार आहे. अन्यथा कोणत्याही प्रकारची रिस्क घेत हे पुल वापरण्यास दिल जाणार नसल्याच सीओंनी म्हंटल आहे.

दरम्यान, परिक्षा संपल्यानंतर सुट्टीच्या दिवसात मुलांना स्वीमिंग करण्यासाठी इतरत्र जावं लागत आहे. अनेक जलतरण पटू सावंतवाडीत असून त्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शहरातील अद्ययावत स्वीमिंग सुरु कराव अशी मागणी सुधीर आडिवरेकर यांनी करत असताना हे स्वीमिंग पूल सुरू करण्यासाठी शहरातील स्वीमिंग ट्रेनरनी पुढाकार घेत आपल्याशी संपर्क साधावा अथवा मुख्याधिकारी यांची भेट घ्यावी अस आवाहन केले आहे. यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेवक उदय नाईक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page