Headlines

पहिलीत दाखलपात्र बालकांसाठी पूर्वतयारी अभियान

मालवण शिक्षण विभागाचा उपक्रम;बीडीओ जयेंद्र जाधव, डायट अधिव्याख्याता सुषमा कोंडुरकर यांची उपस्थिती

ओरोस ता.२३-:शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, जिल्हा शालेय शिक्षण व प्रशिक्षण (डाएट) सिंधुदुर्ग, मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग मालवण याच्यावतीने स्टार्स प्रकल्पअंतर्गत पहिलीला दाखल पात्र बालकांसाठीच्या शाळापूर्व तयारी अभियानाचे उद्घाटन तालुका स्कूल येथे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव व डाएटच्या अधिव्याख्याता सुषमा कोंडुरकर याच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिक्षणाधिकारी संजय माने, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, संजय गोसावी, डाएटच्या अधिव्याख्याता सुषमा कोंडुसकर, केंद्रप्रमुख अन्वर अली शेख, प्रकल्प अधिकारी   कौमुदिनी रसाळ, तज्ञ मार्गदर्शक्  गौरी नार्वेकर, उल्का खोत ,  विशेष तज्ञ  स्वप्निल पाटणे ,विकास रुपनर ,विषय शिक्षक महेश चव्हाण, नितीन पाटील, हनुमंत तावडे, भाऊराव गायकवाड अंगणवाडी   पर्यवेक्षिका स्नेहा सामंत ,स्नेहल गावडे ,रत्नावली कदम ,मंगल जंगले आदी  उपस्थित होते. दोन वर्षापासून कोविडच्या प्रकोपात शाळा बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून दूर झाला. पूर्व प्राथमिक शिक्षण देणारे अंगणवाडी केंद्र देखील बंद आहेत.

     शाळापूर्व तयारी अभियान प्रशिक्षण तालुकास्तरावर झाल्यानंतर प्रत्येक् केंद्रावर 1 ते 5 वी च्या शिक्षकांसाठी  व अंगणवाडी सेविंकांसाठी एकदिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन  करण्यात येणार आहेत.त्यानंतर सर्व शाळास्तरावर शाळापूर्व तयारी अभियान समाजातील सर्व घाटकांच्या मदतीने  राबविण्यात येणार आहे.

त्यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणारे बालके व इयत्ता पहिलित्  दाखल असलेले बालके यांचे पूर्व प्राथमिक शिक्षण काहिहि झालेले नाही. त्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होण्यापूर्वी शिक्षणाची आनंदायी पद्धतीने पूर्व तयारी करून घेण्यासाठी हे अभियान मदत करणार आहे. या अभियानात शाळा स्तरावर विद्यार्थी व पालकांचे मेळावे आयोजीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध क्षमता बघितल्या जाणार असल्याचे तज्ञ मागदर्शकांनी सांगितले. या अभियानात पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांची नोंदणी करून घेण्यात आली. त्याचबरोबर त्यांचा शारिरिक, बौद्धिक, भावनिक विकास, भाषा विकास, गणनपूर्ण तयारी यासाठी शिक्षकांनी स्टॉल उभारले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरती कांबळी यांनी केले.

You cannot copy content of this page