गावठाण भाग ठरवण्यासाठी वेंगुर्ला ग्रामपंचायत हद्दीतील स्थळांची पाहणी सुरू…

३१ मार्च पर्यंत करणार पाहणी…

वेंगुर्ला ता.२३-:* वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण घोषित करण्याबाबत स्थळ पाहणीसाठी वेंगुर्ला तहसिलदार व उपअधीक्षक अभिलेख कार्यालयामार्फत भूमि अभिलेख कर्मचारी, संबंधित मंडळ अधिकारी, तलाठी तसेच ग्रामसेवक, पोलिस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वेंगुर्ला तालुक्यात सदरची स्थळ पाहणी ३१ मार्चपर्यंत करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील गावाच्या ज्या भागामध्ये १५ किवा त्यापेक्षा जास्त घरे असलेल्या क्षेत्रास प्राधान्याने गावठाण घोषित करण्यात येणार आहे. सदर गावठाण घोषित करताना ज्या गावातील लोकसंख्या २ हजार पेक्षा जास्त आहे किवा २ हजारच्या जवळपास आहे अशा गावांची स्थळ पाहणी करण्यात येणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील परुळेची १० मार्चला, आडेली १५ मार्च, शिरोड्याची १७ मार्च, कोचरा २२ मार्चला पहाणी झाली आहे. मठची २४ मार्चला, पालकरवाडीची २९ मार्चला व रावदस गावची ३१ मार्चला स्थळ पाहणी होणार आहे.

You cannot copy content of this page