सेंट्रल इंग्लिश स्कुलच्या केजी, पहिली ते चौथीच्या मुलांसाठी आयोजन
सावंतवाडी ता.२३-:* येथील सेंट्रल इंग्लिश स्कूल मध्ये कोरोनाची मरगळ झटकून विद्यार्थ्यांना उत्साही शालेय वातावरणात परत आणण्यासाठी केजी विभाग व इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विदयार्थ्यांची ऑनलाईन लाईव्ह वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला विद्यार्थी व पालक वर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
ऑनलाईन लाईव्ह वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पोलिस, डॉक्टर, शिक्षक, फूलपाखरू सावित्रीबाई फुले राणी लक्ष्मीबाई, खेळाडू, कोरोनाविषयक जनजागृती अशा वैविध्यपूर्ण वेशभूषा साकाराल्या होत्या स्पर्धेचे परीक्षण एस. पी. के. कॉलेजच्या प्राध्यापिका पुनम सावंत, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम. निलोफर बेग व प्रशालेतील शिक्षिका श्रीम. मारिया पिंटो यांनी केले कोरोनानंतर मोकळ्या शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करण्याच्या दृष्टीने असे उपक्रम शाळेत नेहमीच राबवत असल्याने पालक वर्गाकडून ऑनलाईन स्पर्धेत शाळेचे विशेष कौतूक करण्यात आले
