बांदा पोलिस घटनास्थळी दाखल
बांदा दि.२३-:* तेरेखोल नदीपात्रात आज पुरुषाचा मृतदेह तरंगत्या स्थितीत आढळला. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी बांदा पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नदीपात्रात पाणी जास्त असल्याने मृतदेह काढण्यास अडचणी येत आहेत.
आज सकाळी खतीब यांनी मिळलेल्या माहितीची खात्री करण्यासाठी नदीपात्रावर जात पाहणी केली. मात्र मृतदेह हा शेर्ले नदीपात्रालगत असल्याने खतीब यांनी याची कल्पना बांदा पोलिसांना दिली. पोलीस शेर्ले येथून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र पाणी जास्त असल्याने होडीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, शेर्ले सरपंच उदय धुरी घटनास्थळी उपस्थित आहेत.
