महामार्गावर वेत्ये येथे गॅस पाईप लाईनच्या चुकीच्या कामामुळे दुचाकीचा अपघात…

युवक गंभीर जख्मी; ग्रामस्थांनी रोखले काम…

सावंतवाडी ता.१६-:मुंबई गोवा महामार्गावर मळगाव वेत्ये येथे गॅस पाईपलाईनचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याने एका दुचाकी चालकाचा अपघात झाला असून, तो युवक गंभीर जख्मी झाला असून, त्या युवकाला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून, अधिक उपचारासाठी त्याला गोवा बाबुळी येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मळगाव वेत्ये येथे महामार्गावर गॅस पाईप लाईनचे काम सुरू असून, यावेळी रस्त्यावर रस्ता बंद करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने रॉड लावण्यात आले होते. या रॉडला अडकून एका दुचाकी चालकाचा अपघात झाला असून, तो गंभीर जख्मी झाला आहे. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी सुरू असलेले काम बंद पाडले आहे. तसेच हे काम सुरू असताना योग्य ती काळजी घेण्यात यावी अशी मागणी वेत्ये गावचे उपसरपंच गुणाजी गावडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

You cannot copy content of this page