खारेपाटण केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण

कणकवली ता.१६-:* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने जिहास्तरिय सुलभकांचे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सक्षमीकरण राज्यस्तरीय दोन दिवसीय प्रशिक्षण जि. प. पूर्ण प्रथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ येथे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व शिक्षण तज्ञ संतोष पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाले.

या कार्यक्रमाला शिडवणे उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पांचाळ,शेर्पे गावचे माजी उपसरपंच रामा पांचाळ, चिंचवली ग्रा. प. सदस्या किशोर पेडणेकर,खारेपाटण केंद्राचे केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर,कुरंगावणे भंडारवाडी शाळेच्या अध्यक्षा सौ. प्रणाली पाटील,खारेपाटण टाकेवाडी शाळेचे अध्यक्ष महेश राऊत, खारेपाटण हसोळटेम्ब कोंडवाडी शाळेच्या अध्यक्षा सौ श्रावणी राऊत,नडगिवे नं.१ शाळेचे अध्यक्ष सतीश कर्ले,रामेश्वर नगर खारेपाटण शाळेच्या अध्यक्षा नंदिनी पराडकर, नडगीवे शाळा नं.२ चे अध्यक्ष श्रीधर मण्यार,कुरंगावणे खैराट शाळेचे अध्यक्ष सदाशिव कुडाळकर,सदस्य बाबू गोठणकर,शिडवणे नं.१ शाळेचे अध्यक्ष दिनेश रांबाडे,सदस्य योगेश शिंदे,उर्दू शाळा खारेपाटणच्या श्रीम शमीन सोलकर,कुरंगावणे(प)शाळेच्या समिती सदस्य सौ श्रद्धा सुतार, भाग्यश्री सुतार,खारेपाटण जझिवादी शाळेच्या श्रीम खैबुनिसा मालिन, शेर्पे शाळेच्या सौ संपदा राऊत,शिडवणे कोनेवाडी शाळेचे दीपक पाटणकर, कुरंगावणे(प) शाळेच्या सदस्या सौ मीनल लाड,पूर्वा लाड,शिवाजी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

या दोन दिवस घेण्यात आलेल्या शाळा व्यस्थापन समिती प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन संतोष पाटणकर यांच्या हस्ते झाले. खारेपाटण व शेर्पे या दोन केंद्रातील सुमारे १९ शाळातील एकूण ११० समिती अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.तर या दोन घेण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून सुनील खांडेकर व मंगेश खांबाळकर मैथिली पवार,प्रदीप श्रवणकर,प्रवीण कासार यांनी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण वर्गाला कुरंगावणे खैराटवाडी शाळेचे मुख्यध्यापक श्रीपाद बागडी, कुरंगावणे भंडारवाडी शाळेचे मुख्यध्यापक सखाराम खरात,खारेपाटण काझीवाडी उर्दू शाळेचे मुख्यध्यापक आसिफ सय्यद,नडगीवे नं.१ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता पाटकर,शेर्पे शाळा श्रीम दीपाली खुटाले,खारेपाटण रामेश्वर शाळेच्या मुख्यध्यापक सौ छाया पडोळकर,कुरंगावणे(प) शाळेचे मुख्यध्यापक आशिष दुधे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.या प्रशिक्षण वर्गाचे सुत्रसंचलन अनिल खोत सर तर प्रास्तविक केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी केले.तर सर्वांचे आभार खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी मानले.

You cannot copy content of this page