प्रशासनाच्या विरोधात भाजपा आंदोलन छेडणार

राजन तेली एसटीच्या संपामुळे कोकणातील चाकरमान्यांचे हाल

कणकवली ता.१६-:* होळी सण येत आहे,कोकणात होळी सणाला येणाऱ्या चाकरमान्यांची अडचण झाली आहे.एसटी कामगारांचा संप आहे,त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील मोठा फटका बसला आहे.त्याला परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार आहेत,असा घणाघाती आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.या विरोधात मंगळवार न्याय न मिळाल्यास भाजपा विधिमंडळात आवाज उठवणार आहे.जिल्हा नियोजनचा ८८ कोटींचा निधी खर्च झाला असून फक्त ५० टक्केच खर्च झाला आहे.भाजपा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडणार इशारा श्री. तेली यांनी दिला.

भाजप जिल्हा कार्यालय कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली बोलत होते. राजन तेली म्हणाले,अनिल परब मंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील एसटी बसस्थानक व अन्य कामे होतील.कोकणी जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.आता होळीसाठी येणाऱ्या चाकरमान्यांना वारेमाप पैसे द्यावे लागताहेत.

खासगी बसेस धारक लूट करत आहेत.कॉलेज चालू झाली आहेत,मुलांच्या परीक्षा आहेत,होळी सण असताना एसटी सेवा बंद आहे.संपकरी लोकांना थांबवण्यासाठी शासनाला कुठलेही यश आले नाही.उत्तर प्रदेश मध्ये परिवहन सेवा फायदेशीर ठरत आहे.मग आपल्या राज्यात लिकेज कुठे आहे? गोंधळ कुठे आहे?याची चौकशी करावी.उत्तर प्रदेश प्रमाणे राज्यात एसटी फायद्यात आली पाहिजे,अशी मागणी राजन तेली यांनी केली. कोरोनापूर्वी एसटी बसस्थानके नुतनीकरण करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात निधी देण्यात आला होता.ती कामे ठप्प या सरकारने केली

आहे.जिल्ह्यातील बसस्थानकांची अवस्था बिकट आहे.कणकवली, मालवण,सावंतवाडी या बसस्थानकांची अवस्था वाईट आहे,असा टोला राजन तेली यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन १७० कोटी आले, त्यापैकी केवळ ८८ कोटी खर्च झाला आहे.पालकमंत्री उदय सामंत यांचा अंकुश नसल्याने ही परिस्थिती आहे.स्थानिक विकास कार्यक्रमान अद्याप मंजुर नाही.आता मार्च आला,मंजुरी केव्हा मिळणार?जिल्ह्यातील ढिसाळ कारभार यावरून दिसून येत आहे.मार्च अखेर पर्यत हा निधी खर्च न झाल्यास प्रशासनाच्या विरोधात आंदोलने भाजपा करणार आहोत. पुढील काळात आम्ही तिव्र आंदोलन करणार आहोत.कुंभवडे व अन्य छोटी धरणे झालीत पण शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.जलसंधारण विभागाच्या विरोधात आंदोलन करणार आहोत.ज्या ठिकाणी भूसंपादन न करता काम चालू केली ,त्या विरोधात आंदोलन आम्ही करणार इशारा राजन तेली यांनी दिला.

You cannot copy content of this page