आधार चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत आडवली-मालडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
वैभववाडी ता.१६ संजय शेळके-:* “जागतिक महिला दिन” या दिनाचे औचित्य साधून आधार चॅरिटेबल ट्रस्ट व ग्रामपंचायत आडवली-मालडी यांच्या संयुक्त विद्यमाने आडवली पंचक्रोशीतील महिला भगिणीसाठी विविध स्पर्धांचे आयोजन आर.ए.यादव हायस्कुलच्या सभागृहामध्ये करण्यात आले होते. मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी मा.श्री.सुशांत नाईक (संचालक- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक सिंधुदुर्ग.) मा.श्री.अरुण लाड (संस्थापक,आधार चॅरिटेबल ट्रस्ट,आडवली. ),मा.श्री.शंकरजी वस्त(सामाजिक कार्यकर्ते,वायंगणी) यांचा शाल-श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमानिमित्त झालेल्या विविध स्पर्धेत आडवली गावातील महिलांनी बहुसंख्येने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे आयोजक मा.अरुण भाई लाड यांच्या सौजन्याने स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. “खेळ पैठणीचा” या स्पर्धेने तर कार्यक्रमाची रंगत वाढविली होती,रसिकांना मनमुरादपणे निखळ आनंद घेता आला.या स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पैठणी,मिक्सर आणि कुकर बक्षीस स्वरूपात देण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आडवली गावचे सुपुत्र,उत्तम प्रशासकीय अधिकारी मा.श्री.राजेंद्रजी पराडकर साहेब(उपमुख्य कार्यकारी अधिकारी,सिंधुदुर्ग) उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत “लकी ड्रॉ” चा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्यांच्या शुभ हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. “लकी ड्रॉ” तील शेवटच्या भाग्यवान विजेत्यां सौ. सावित्री चव्हाण यांना मा.श्री.अरुण भाई लाड यांच्यातर्फे आठ हजार रुपये किंमतीची किचन शेगडी देण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त आर.ए. यादव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सन.२०१९-२० व २०२०-२१ मधील पारितोषिके वितरित करण्यात आली.
यावेळी सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई संस्थेचे संस्थाध्यक्ष मा.डॉ.श्री.प्रकाश बळीराम साटम, माननीय श्री कमलाकांत कुबल अध्यक्ष, शाळा समिती आडवली. सर्वोदय एज्युकेशन सोसायटी मुंबई संस्था सदस्य मा.श्री.प्रमोद साटम,मा.श्री.संजय आडवलकर सरपंच,ग्रामपंचायत आडवली-मालडी सर्व उपस्थितांना समोसा अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची आभार प्रदर्शनाने सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे निवेदन श्री.सकपाळ सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री.कोळापटे यांनी मानले.
