अन्यथा उपोषण; संजू परब यांचा बांधकाम विभागाला इशारा
सावंतवाडी ता.१५-: शेर्ले-मडूरा-सातोसे या गावातील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, येत्या पंधरा दिवसात या रस्त्यांचे डांबरीकरण न झाल्यास बांधकाम कार्यालया समोर उपोषण छेडण्यात येईल. असा इशारा भाजपा जिल्हा प्रवक्ते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.
यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, रस्ता खराब झाल्याने या गावात जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, याबाबत अनेकांच्या तक्रारी देखील आपल्याकडे दाखल झाल्या असून, तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.यावेळी मनोज नाईक,आनंद नेवगी आदी उपस्थित होते.
