सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने अँड. दीपक नेवगी यांना वाहण्यात आली श्रद्धांजली

सावंतवाडी ता.१५-:* सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ अँड दीपक नेवगी यांना शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यावेळी अँड. नेवगी यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक व वकिली व्यवसायातील अष्टपैलू नैपुण्य गुणांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे.

यावेळी न्यायाधीश सौ. सुतार अँड. दिलीप नार्वेकर, अँड. सुभाष पंणदूरकर, अँड. परिमल नाईक, अँड. शामराव सावंत, अँड. संदीप नींबाळकर, अँड. प्रमोद देसाई, अँड. नीता कविटकर, यांनी आपले श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. सदर वेळी बहुसंख्य वकील वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page