असरोंडी उपसरपंच मकरंद राणे यांनी केली वचनपूर्ती

असरोंडी गावात पाण्याची व्यवस्था करत गैरसोय केली दूर

कणकवली ता.१४-:* असरोंडी ग्रामपंचायत उपसरपंच मकरंद राणे यांनी स्थानिकाच्या समस्यांची दखल घेत दिलेले वचन पूर्ण केले आहे.असरोंडी गावात पाण्याची व्यवस्था करत मोठी गैरसोय दूर केली आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कित्येक वर्ष असरोंडी ग्रामपंचायतमध्ये पाठपुरावा करूनही असरोंडी बौद्धवाडी मधील स्थानिकांना पाईप लाईनद्वारे पाणी देण्यास अडथळे येत होते. मात्र उपसरपंच मकरंद राणे यांनी स्थानिकांचे होणारे हाल लक्षात घेऊन वाडीतील नागरिकांना वचन दिले की मी उपसरपंच असेपर्यंत वाडीत तात्पुरती तरी नळयोजना राबवणार. 2012 पासून ग्रामपंचायत मध्ये स्थानिक आणि मुंबईकर सातत्याने नळयोजना करून मिळावी म्हणून पत्रव्यवहार करत होते.वाडीतील बहुतांश स्थानिक वयोवृद्ध असल्यामुळे विहिरीवरून पाणी घेऊन जाण्यास महिलांना असह्य होत होते. सरकारकडून एकाबजूने महिला सक्षमीकरण म्हणून अनेक उपक्रम राबवले जातात तर दुसरीकडे खेड्यापाड्यात अशा उपक्रमापासून महिला वंचित आहेत.वाडीतील घरे जवळ जवळ असल्यामुळे अर्थातच ते सोयीस्कर होते परंतु इतरांना जे शक्य झाले नाही ते उपसरपंच मकरंद राणे यांच्या पुढाकाराने ते यशस्वी करता आले.

आपल्या गावची प्रगती आणि लोकांबद्दल असलेली सहानुभुती लक्षात घेऊन एक मोठं रखडलेले काम पूर्ण करून स्थानिकांना मोठा दिलासा दिला. ग्रामपंचायत द्वारे नवीन विहिरीवरून पूर्ण वाडीला नळयोजना ग्रामपंचायतीच्यावतीने करून देण्याचे आश्वासन दिले आहेच परंतु त्याला विलंब लागेल तो पर्यंत महीलाचे हाल होऊ नये म्हणून स्थानिकांच्या मागणीवरून घरापर्यंत पाइपलाइन करून पाणी दिले हे महत्वाचे काम पूर्ण केले.

उद्घाटन प्रसंगी जि प. बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण , ग्रामपंचायत असरोंडी उपसरपंच मकरंद राणे, ग्रामपंचायत सदस्य श्रेया गावडे , संजय सावंत , माजी सरपंच संतोष महाजन आणि ज्येष्ठ स्थानिक रहिवाशी बाबू तांबे , जयसिंग जाधव आणि वाडीतील इतर रहिवाशी सदस्याच्या उपस्थितीत पार पडले.वाडीतील रहिवाशी यांनी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण , उपसरपंच मकरंद राणे यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून पुढील गावातील समस्या सोडविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page