तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले भूमिपूजन
सावंतवाडी ता.१४-:* माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या तालुक्यातील कवठणी खासबाग ते मुरकरवाडी ख्रिश्चनवाडी रस्त्याचे भूमिपूजन तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी उपसभापती चंद्रकांत कासार, जि. प. सदस्य राजन मुळीक, युवासेना तालुका अधिकारी योगेश नाईक, विभाग प्रमुख आबा केरकर, सुधा कवठणकर, उपजिल्हाधिकारी सागर नानोस्कर, उदय परीपत्ते, ओवळीये सरपंच विनायक सावंत, योगेश गोवेकर , ग्रामपंचायत सदस्य साक्षी कवठणकर, तेजा सावंत, सद्गुरु कवठणकर, संदेश कवठणकर, दीपक कवठणकर, इंद्रजीत कवठणकर ,सुरेश कवठणकर, सुरेश कांबळी आदी उपस्थित होते.
हा रस्ता व्हावा म्हणून ग्रामस्थांची गेली बरीच वर्षे मागणी होती. माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून निधी मंजूर झाला असून, लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे तालुकाध्यक्ष राऊळ यांनी सांगितले. शिवसेना व आमदार केसरकर यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
