दोन व्यक्तीचा समावेश;कारवाई करण्याची संस्थेची पोलिसांकडे मागणी
सावंतवाडी ता.१२-:* आंबोली येथील सैनिक स्कूलचे नाव वापरून दोन अज्ञात व्यक्ती व्यापाऱ्यांना गंडा घालत असून, त्यामुळे शाळेचे नाव खराब होत असल्याने संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार आंबोली सैनिक स्कूलच्या संस्थेने सावंतवाडी पोलिस स्थानकात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपासून दोन अज्ञात व्यक्ती तालुक्यातील काही व्यापाऱ्यांना फोन करून शाळेसाठी वस्तूच्या ऑर्डर देऊन गडा घालत आहेत. त्यामुळे सैनिक स्कूल ची नाहक बदनामी होत असून, शाळेच्या शिक्षकांसह, कर्मचारी आणि संस्थेला मानसिक त्रास होत आहे. तसेच शाळेच्या दैनंदिन कामात अडथळा निर्माण होत आहे. याविरोधात सैनिक स्कूलच्या संस्थेने पोलिसात तक्रार दिली असून, सैनिक स्कूलच्या नावाने फोनवरून कोणीही ऑर्डर दिल्यास त्या स्वीकारू नयेत असे आवाहन देखील त्यांनी व्यापारी वर्गाला संस्थेने आणि प्राचार्य एस.टी. गावडे यांनी केले आहे.
