सेनेची मासिक सभा १४ मार्च रोजी

वेंगुर्ला ता.१२-:* वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक सभा १४ मार्च रोजी साई डिलक्स हॉलमध्ये जिल्हाध्यक्ष संजय पडते, सतिश सावंत, संग्राम प्रभूगांवकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

या सभेत तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेण्याबरबरच तालुक्यातील सेनेच्या रिक्तपदावर नियुक्ती तसेच प्रत्येक गावातील वाडीनिहाय गटप्रमुखांची निवड केली जाणार आहे. लवकरच होणा­या नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकांसंदर्भात चर्चा होणार आहे. या सभेस सर्व फ्रंटमधील पदाधिकारी व सेना कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page