हवा का झोका कोणाचा येईल हे आगामी निवडणुकीत दिसेल…

युवा सेना शहर अधिकारी विशाल सावंत यांचा माजी नगराध्यक्ष संजू परब यांना टोला

सावंतवाडी ता.११-:* इतर राज्यात भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंद उत्सव लाडू वाटून साजरा करणाऱ्यांनी पहिल्यांदा सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी काळातील निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला युवासेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांना दिला असून, हवा का झोका कोणाचा येणार हे निवडणुकीत दिसेलच असा टोला लगावला आहे

. सावंतवाडी ही उपरलकर आणि पाटेकर या देवतांची शांत भूमी आहे. हे विरोधकांनी विसरू नये, आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीत आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यावेळी आमचे विजयी लाडू आपल्या पर्यंत आम्ही नक्की पोचवू अशा शब्दात त्यांनी भाजपच्या कालच्या जल्लोषाची खिल्ली उडवली आहे.

You cannot copy content of this page